आजपर्यंत रासायनिक पद्धतीने शेती करत होतो ,डायरेक्ट SCTवैदीक वर शेती करू शकतो काय ⁉️

SCTवैदीक
 आजचा प्रश्न:- आजपर्यंत रासायनिक पद्धतीने शेती करत होतो ,डायरेक्ट SCTवैदीक वर शेती करू शकतो काय ??
   मित्रहो ,
  या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात देने सहज शक्य आहे परंतू ते तसे देणे शेतकर्यांसाठी घातक आहे कारण केमिकल व SCTवैदीक यांची कार्यप्रणाली पूर्णपणे परस्पर विरोधी आहे ‼️
   सर्वज्ञात आहे केमिकल विष आहे तर SCTवैदीक अमृत‼️
   कालपर्यंत विष देत होतो आज पासून अचानक अमृत चालेल का  ??
  असा हा प्रंश्न आहे ‼️
    चला थोडे समजून घेऊया ,थोडा निवांत वेळ काढा व चिंतन करा , फक्त वाचू नका 
  रासायनिक शेतीची बाजू मांडताना काही तज्ञ दारू चे उदाहरण देतात , की जशी एखाद्या व्यक्तींचा दारू एकदम सोडली जाऊ शकत नाही तसे केमिकलची सवय झालेल्या जमिनीत एकदम SCTवैदीक चालेल काय‼️
     म्हनजे दुसर्या बाजूने पाहीले तर ते हे देखील मान्य करता की , केमिकल मुळे पिकांना नशा दीली जाते मग ती पिके नशेत मातीचे नापिक होईपर्यंत शोषण करतात‼️
    ज्याप्रमाणे एखादा मद्यधुंद व्यक्ती आपण काय खातोय व काय नाही याचे भान नसताना तो ते खातो तसे केमिकलचे शोषण ( अपटेक ) पिकाकडून होते ते उत्तेजनेमुळे होत असल्यामुळे ते असंतुलीत व अनावश्यक प्रमाणात केले जाते‼️
  परिणामी पिकावर (टॅाक्सीक ) विषाक्त परिणाम होतात ‼️
   करपा येणे , फुलगळ , कुज होणे , मर होणे , नेमॅटोड व तत्सम परजीवींची संख्या वाढने‼️
     मुळातच सिंथेटीक ( कृत्रीम ) फर्टिलायझर्स (खते ) मातीतील जीवांचे  किंवा पिकांचे अन्नच नाही ते हायब्रिड व्हरायट्यांना सेन्स ( ज्ञान ) नसल्यामुळे भुकेपोटी शोषले जातात‼️
   जर हे केमिकल खते सहजासहजी शोषले गेले नाही तर शेतकरी पिजीआर वापरून पिकाला पुर्णपणे बेहोश करतात आणि  पिकाकडून जबरदस्ती अपटेक करून घेतात‼️
   पिकांच्या प्रत्येक अवस्थेत अर्थात उगवने , फुलधारणा , फळधारणा , पानगळ , परिपक्वता , साईज , कलर अशा प्रत्येक स्टेजला काही ना काही उत्तेजक , ( पिजीआर ) पोषक या गोड नावाखाली वापरून कृत्रीम शेती केली जाते‼️
    अशा कृत्रीम रित्या उत्तेजन व पोषण देऊन पिकवलेल्या शेतमालाच्या गुणवत्तेची तसेच टिकवन क्षमतेची कोणतीही खात्री नसते कारण ते अप्राकृतिक असते‼️
   असे अन्न खानारे ग्राहक सुद्धा आपले आरोग्य धोक्यात आल्याचे अनुभव सांगतात‼️
     खरंतर याच कारणामुळे केमिकल शेतीचे वर्तमान व भविष्य धोक्यात आलेले आहे‼️
   एकीकडे निसर्गाचा मार , दुसरीकडे ग्राहकांचा तिरस्कार अशा दुहेरी कात्रीत केमिकल शेती सापडली आहे‼️
  आता ज्यांनी वैतागून दुसरे मार्ग स्विकारण्याचा प्रयत्न केला त्यांनी सेंद्रीय व जैवीक शेतीवर भर दिला , उदा शेजारील देश श्रीलंकेचे उदाहरण घ्या , काही अर्थतज्ञ तेथील सेंद्रीय शेतीच्या सक्तीला आर्थिक संकटाचे प्रमुख कारण मानतात‼️
     मुळात हे सखोल जाऊन कोणीही तपासत नाही, मुळात जैवीक किंवा सेंद्रीय शेती कमर्शियल केमिकल शेतीचा कधीच सामना करू शकत नाही हे , तज्ञांनी समजून घ्यायला हवे‼️
   कारण सेंद्रीय अवशेष किंवा जिवाणू हायब्रीड व्हरायट्यांची राक्षसी भूक भागविन्यास असमर्थ आहेत‼️
   का ?? कारण ओरगॅनिक शेतीत वेस्ट वापरले जाते , धान्य काढून घ्यायचे व काडी कचरा मातीला खत म्हनून द्यायचा , कसदार दूध आपण खायचे व मातीला निकस शेण द्यायचे ‼️
    SCTवैदीक म्हनते वेस्ट( कचरा )  देऊन पेस्ट ( किटक व रोग ) येतात व बेस्ट ( कसदार ) दिले तर टेस्ट ( क्वालीटी ) येनार ‼️
    एका वाक्यात उदाहरण द्यायचे तर भुईमुगाच्या शेंगदाण्याच्या शक्तीची बरोबरी टरफल करू शकतात का ??
   म्हनजे टरफल वेस्ट आहे म्हनजे ओरगॅनिक आणि शेंगदाणे बेस्ट आहे म्हनजे SCTवैदीक ‼️
    आणि हे हजारो शेतकर्यांच्या अनुभवातून सत्यात उतरत आहे ‼️
   पिकांना हवे सकस व मानवी आहाराप्रमाणे प्रिमियम सात्विक पोषण‼️
    SCTवैदीक द्वारे आपण असे सकस व दुर्मिळ जडीबुटींचे ऋषिमुनींच्या मदतीने पंचमहाभूतांचे संस्कार करून पिकांची वैदीक आहार प्रणाली विकसीत केलेली आहे‼️
    ज्याप्रमाणे १ कि स्टीव्हीया ( वैदीक) ३० किलो साखरेच्या ( केमिकल ) गोडीची भरपाई प्राकृतिक पणे करते त्याप्रमाणे  SCTवैदीक तंत्रज्ञान केमिकलच्या  तुलनेत अत्यंत कमी प्रमाण परंतू अत्यंत ताकतवर पोषण पुरवते‼️
    १०० रू च्या पिशवीभर भेळभत्त्याऐवजी १०० रू चे मुठभर ड्रायफ्रूट्स अधीक शक्तिशाली असतात त्याप्रमाणे रासायनिक शेती तात्काळ बंद करून SCTवैदीक  तंत्रज्ञान वापरने सहज शक्य आहे ‼️
  धान्य , भाजीपाला , फळभाज्या , चारा , फुलशेती अगदी पहिल्या प्रयत्नात यशस्वी होते ‼️
     सुरूवातीला पोषण थोडे फार जास्त लागू शकते परंतू एकदा मातीचा नायट्रोजन व कर्ब रेशो संतुलित झाला की शेती सहज व सोपी  होऊन जाते‼️
   पहिले वर्ष आपल्या व मातीच्या सवयी बदले पर्यंत काळजी घ्यावी लागते , यशही मिंळते परंतू पुढील बहरापासून शेती सोपी होऊन जाते‼️
      याला काही प्रमाणात अपवाद आहे , द्राक्ष, आंबा , डाळींब , संत्री  व इतर फळबाग शेती , कारण जर तुम्ही बहुवर्षीय पिकांवर वाटर  सोल्यूबल  , पिजीआर ( जीए , सायटोकायनीन्स वगैरे ) व विषारी बुरशीनाशके यांचा अतिरेकी वापर केला तर त्या मातीवर नाही तर झाडांच्या डीएन ए वर दूरगामी परिणाम होतात ‼️
    SCTवैदीक वापरन्यापुर्वी शेतकरी हा विचार करत नाहीत की आपण मातीचे किती शोषण केले , पीएच ईसी किती वाढला , सेंद्रिय कर्ब किती घसरला , आपण मातीचे अगदी वाळवंट करत आनले , वरतून अशा निकस व दुषीत मातीत बाग घेऊन त्यावर पीजीआर व वाटरसोल्यूबल ची केमिकल खते वापरून त्या बागेतील झाडांचा डीएनए कमजोर केलेला आहे‼️
     SCTवैदीक तुम्ही यापुर्वी केलेले मातीचे नुकसान आणि झाडांचे कुपोषण याची जबाबदारी शेतकरी उचलत नाही, त्यांना रिझल्ट मात्र आज आत्ता ताबडतोब पाहीजे असतो , त्यांनी यापुर्वी केलेले खड्डे भरून काढल्या शिवाय वैदीकचे परिणाम प्रभावी पणे दिसत नाही‼️
   त्यामुळे किमान एक दोन बहर SCT वैदीक मध्ये सातत्य ठेवल्यास फळबांगमध्ये विक्रमी उत्पादन घेणे सहज शक्य आहे ‼️आणि विशेष म्हनजे बागेचे आयुष्य , आरोग्य आणि उत्पादन क्षमता १५०-२०० % पर्यंत वाढते‼️
    बरेच  SCTवैदीक युजर बागाईतदार असेही आहेत ज्यांनी पहिल्याच बहरात दुप्पट पोषण देऊन बागेची रेस्ट काळात झीज भरून काढली व पहिल्याच बहरात त्यांनी रोगग्रस्त बागांमध्ये विक्रमी उत्पादन घेतले‼️
    शेतकर्यांना आमचे ओफीसर सांगतात की  SCTवैदीक तंत्रज्ञान अवगत होईपर्यंत तुम्ही थोड्या क्षेत्रावर वापर करा , परंतू युट्यूब वरचे रिझल्ट पाहून अती उत्साही शेतकर्यांना १००% बागेवर वापरुन फायदा करून घ्यायचा असतो , 
    परिणामी पुर्ण बागेवर रोख खर्च करने वेळेवर आवश्यक प्रोडक्ट उपलब्ध करने जमत नाही मग ते सातत्य नसल्याने अपयशी ठरतात‼️
     लक्षात घ्या तुमची बाग नुकतीच संकटातून बाहेर आलीय अशा बागेला जर पोषण मागेपुढे झाले तर बाग पुन्हा मागच्या अवस्थेत जाते‼️
    म्हनून केमिकल पद्धतीने  शेती करनार्या शेतकर्यांना SCTवैदीक मध्ये यश मिळवने कठीन जाते ‼️
  समस्या टेक्निकल नसून मानसिकते बाबत आहे ‼️
    केमिकल मध्ये आज आत्ता ताबडतोब म्हनजे अतीघाई ची सवय लागली , काय विकत घेतो याचा अभ्यास न करता उधार घ्यायची सवय लागली , पोषण सोडून रोगावर लक्ष द्यायची सवय लागली , अशा प्रकारे तात्पुरती समस्या सोडविन्याच्या सवयीमुळे फळबाग शेती धोक्यात आली आणि तीच मानसिकता घेऊन शेतकरी  SCTवैदीक मध्ये उतरतांत ‼️
   असे शेतकरी कदापी यशस्वी होऊ शकत नाही‼️
    फळबाग म्हटले तर दूरचा विचार करन्याची अर्थात नियोजन - कार्यवाही व देखरेख या त्रीसुत्रीचा वापर शेतकर्यांनी केला पाहीजे‼️
      SCTवैदीक सोबत बागांना वर्तमानासोबत भविष्याही आहे याचा विचार बरेच शेतकरी करत नाहीत‼️
    तुम्ही आज देत असलेले पोषण पुढच्या वर्षासाठीची गुंतवणूक आहे असा विचार करनारे शेतकरीच फळबागा करन्यास पात्र आहेत‼️ फक्त आजपुरता विचार करने म्हनजे बाजरी गहू मका , भुईमुग पिकवन्याची मानसिकता होय , ही फळबागांमध्ये वापरून फळबागा बर्बाद झाल्या‼️
    आपले अज्ञान तसेच ठेऊन दूसरे कोणीतरी आपल्या बागेची जबाबदारी घ्यावी अशा भोळ्या आशेपोटी कंसल्टंट किंवा शेतीचे डॅाक्टर जन्माला आले , जर ते डॅाक्टर एवढे हुशार आहेत तर ते त्यांची घरची शेती एक नंबर का पिकवत नाहीत , याचा विचारही शेतकरी करत नाहीत, अपवाद वगळता ९७ % मार्गदर्शन हे अनुभव नसताना होते‼️
    मुळात  SCTवैदीक मध्ये केमिकल सारखी गुंतागुंत नाही , साधे सरळ नावे आहेत , लीफ चार्जर म्हटले की पानावर काम करते , रूट चार्जर म्हटले की मुलीवर काम करते , डीसीज फायटर म्हटले की रोगाशी प्रतीकाच करते म्हनजे कोणताही १०-१२ वी शिकलेला शेतकरी याचे रहस्य जाणून वापरू शकतो‼️
     SCTवैदीक तंत्रज्ञान वापरने अतिशय सोपे आहे ही गोष्ट चांगली आहे की नाही ‼️
     परंतू ज्यांना खूप आदबून केमिकल ची शेती करन्याची सवय लागली त्यांना ही समस्या वाटते गरज नसताना केमिकल चा प्रिव्हेंटीव्ह फवारणी करने , एखादी NPK ची निवळी सोडल्याशिवाय त्यांचे मन शांत होत नाही‼️
   त्यांना SCTवैदीक चा बेसल डोस मध्ये वाढीव डोस भरा किंवा दुसरा डोस लवकर टाका म्हटले की ते नाराज होतात परंतू केमिकल वापरायला तत्पर होतात‼️कारण असते आजूबाजूला सर्व तेच करत असतात परंतू आपन वेगळे करतो मग चुकल्या सारखे वाटते , फेल गेलो तर लोक काय म्हनतील , याची चिंता करतात , यासाठी आम्ही सांगतो रोज यूट्यूबवर एक तास व इंटरनेट साठी १०-१५ रू खर्च करा‼️ 
   एकूणच केमिकल शेती करत असताना अचानक SCTवैदीक पद्धतीने शेती करने सहज शक्य आहे फक्त सुरूवातीचे एक वर्ष थोडा संयम व अभ्यासू वृत्ती बाळगणे गरजेचे आहे ‼️
    दुसरी महत्वाची बाब म्हनजे पाणी  व्यवस्थापन SCTवैदीक मध्ये फार महत्त्वाचे आहे , वाफसा ठेवने अत्यंत महत्त्वाचे आहे , तज्ञांच्या व मार्गदर्शकांच्या मदतीने तुम्ही ते सहज समजून घेऊ शकता‼️
   आमचे हजारो व्हिडीओ  पाहून तुम्ही खुप काही शिकू शकता आणि ते गरजेचे आहे , तुम्हाला पडनार्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळतात‼️
     अधिक माहीतीसाठी आमच्या युट्यूब चैनल ( soil charger tech. ) ला जरूर भेट द्या व अनमोल ज्ञानाचा खजीना स्वतासाठी उपलब्ध करा ‼️ 
 
राम सर
  हा लेख copyright ©️ act 2022 अन्वये सुरक्षीत आहे , एडीट करने बेकायदेशीर आहे .

  अधिक माहितीसाठी संपर्क करा. 8669200221/2/3/4/5/6/7/8

botão whatsapp

SCT Consulting

botão whatsapp

SCT Sales

botão whatsapp

SCT Management