Scroll
शेतकरी मित्रहो
जेव्हा तरुण शेतकरी असे प्रश्न विचारतात ,
सर फुगवनिवर औषध सांगा ?
तेव्हा मला त्यांचे अज्ञान पाहून हसावे की त्यांची अवस्था बघुन रडावे तेच कळत नाही
मला सांगावे लागते...
शेती समजून घ्या माझ्या भावानो....
सायन्स मध्ये लपलेले रहस्य शिका , ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणून बहुजन समाज अंधश्रध्येतुंन बाहेर येण्याची प्रक्रिया चालू झाली‼
तशी शेतीमध्ये अश्या ज्ञानेश्वरी ची गरज आहे , आणि माझ्या Msc agree झालेल्या मित्रांना माझी विनंति आहे तुम्ही ही शेतीची ज्ञानेश्वरी लिहु शकता ☝
फुगवनिसाठी असले कुठलेही औषध नसते ‼ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे .जी पनांमध्ये घडते
कोणतेही झाड़ प्रकाश संश्लेषण क्रिएमधुन फलपोषण करत असते‼दूसरा शॉर्टकट नाही‼
त्यामुळे पांनांचे आरोग्य जपा
त्यांना पोषण दया
पान मोठे फल मोठे‼
पान लांब
फल लांब‼
पान चमकदार
फल चमकदार‼
... आणि मूळ जोमदार तरच पान जोमदार‼
आणि माती कसदार तर मूळ जोमदार‼
मित्रहो , एकूणच काय ... मातीचा कस सांभाळला की आपले काम झाले . हाच खरा मंत्र आहे बाजारातून खते औषधे तर लहान मुले पण आणतील आणि टाकतील पण मातीचा कस जो गेली कित्येक वर्ष कमी होत गेला तो सुधारने हा पोरखेळ नाही ☝
सॉइल् चार्जर टेक्नोलॉजी नेमकी हेच काम करते, मातीला सुपिक बनविने आर्गेनिक कार्बन वाढविने‼
लक्षात ठेवा... अर्जेंट साइज़ बनविनारि औषधे झाड़ाचा कस काढुन घेतात
तेच सगळी कड़े चालू आहे...
शेतकरी दळतोय आणि भलतेच पीठ घाताय‼
जागे व्हा...
जर दरवर्षी द्राक्ष वेल किंवा डालिम्बच्या झाडांचा कस काढुन घेता आहात असले उत्तेजक औषधे मारून तर हीच वेळ येणार ‼
आता तरि विचार करा
साधी सरळ घटना आहे.
द्राक्षाचे उदहारण पहा...
ह्यूमिड वातावरणमुळे डाऊनी येते हे बरोबर आहे पण मग 100% बागांवर का येत नाही⁉
त्यांना काय स्वर्गातून औषध येते का⁉⁉⁉
शेतकरी टेंपररी सोलुशन साठी पळनार तोपर्यंत असेच होणार‼
जर दररोज पावुस आहे ढगाळ वातावरण आहे तर प्रकाश संश्लेषण कसे होणार ⁉
आणि प्रकाश संश्लेषण नाही झाले तर झाड़ काय हे खते ,जिवाणु, बुराशिनाशके यांना खानार काय⁉
झाड स्वता अन्न बनविते तेव्हाच त्याला मिळते‼
त्याला ते बनविन्यासाठी आवश्यक परिस्थिति निर्माण करने हे आपले काम आहे
निरोगी पानांची कैनोपी , मातीत भरपूर आर्गेनिक कार्बन, व ग्रोथ हार्मोन्स चा मर्यादित वापर हे तिन महत्वाचे घटक आहेत.
त्यामुळे रेस्ट काळात भरपूर साठा करून बाग़ सशक्त बनवून ठेवणे हे अत्यंत महत्वाचे‼
एक मन्त्र लक्षात ठेवा...
खरड छाटनित जे शेतकरी खुप मेहनत करतात ते गोडी छाटनित आराम करतात त्याची बाग़ मेहनत करते☝या वुलट जे शेतकरी एप्रिल मध्ये केवळ लग्नकार्य खात फिरतात त्यांना गोडी छाटनीचे 4 महीने अन्न गोड लागत नाही‼
मित्रहो फार अवघड नाही ...द्राक्ष शेतीचा टेंशनफ्री आनंद घ्यायचा असेल तर...
खरड छाटनीचे SCT शेड्यूल काटेकोर पाळामग आरामच आहे
रेस्ट काळात यशस्वी बाग़शेतीचे उत्तर आहे. आमचे चैलेंज आहे एप्रिल छाटनिपासुंन सॉइल चार्जर टेक्नोलॉजी व कृषि अमृत वापरा बागेत डाउनी आली, साइज़ नाही झाली तर खर्च आमचा‼
यापेक्षा काय खात्री देवू...
हे उदहारण पहा....
लहान बाळाला दोन दोन दिवस आईने दूध द्यायचे बंद केले ती जर झोपुन राहात असेल तर बाळ अशक्त होणार व रोगला बळी पडणार‼
अश्या वेळी त्याला दुधाची गरज आहे की औषधचि⁉
साहाजिकच आधी दुधाची मग औषधचि‼
सतत पावुस ,थंडी,उष्णता अश्या प्रतिकूल परिस्थितीत झाड़ डॉर्मेन्ट कंडीशन (सुप्त अवस्था) मध्ये जाते‼
साहजिकच लहान घड़ निघालेले असतात त्यांना अन्नरस बंद होतो साहजिकच ते कमजोर होते आणि रोगला बळी पडते‼
आपण गुड़गघ्यात मेंदू आल्यासारखे घे औषध मार फवारे....
घे जीए ,cppu अन बोलवा ईएसएस....‼
अरे काय चाललेय त्याच्या दुधाची व्यवस्था करायाचे सोडून औषधांची खिरापत काय वाटत फिरताय⁉
घडाला वेलिकडून मिळणारा अन्नरस चालू करा ते नसेल तर औषधाने वरवर मलमपट्टी होईल‼
हे ध्यानात घ्या ,
आभाळ फुटले पळा पळा‼
असे भित्रै ससे झालेत द्राक्ष शेतकरी‼
तळ तळ येते पोटतीडकिने ओरडतोय .... लक्षात घेणारे किती⁉
कमी सूर्य प्रकाशात अन्न निर्मिति करण्यासाठी क्रॉप चार्जर व फ्रूट चार्जर चे कॉम्बिनेशन खुप प्रभावी आहे, ते नैसर्गिक अन्न आहे, झाडांच्या अवशेषां पासुन बनलेले आहे‼
ते एक प्रकारचे फ़ास्ट फ़ूड आहे
त्यात नैसर्गिक फुल्विक आहे जे ट्रांसलोकेशन म्हणजे अन्तर्गत वहन चालू ठेवते‼ पेशी भित्तिकेमधुन मुलद्रव्यांचे वहन करते ‼त्यामुळे जेवढे बुराशिनाशक काळजी ने फवारणी करता त्यापेक्षा जास्त काळजीने फ्रूट चार्जर वापरा , 20 लीटर पैकमध्ये घेतले तर 220 रुपये लीटर आहे पेटेंटेड आहे‼ते घडासाठी दूध आहे हे आवर्जून लक्षात ठेवा‼
आणि
सॉइल चार्जर मध्ये 16 घटक आहेत त्यापैकी...
ऑक्सिजन आहे व हाइड्रोजन आहे‼
पावुस व् चिडचिड यामध्ये मूळांना ऑक्सिजन पूरवन्याचे काम सॉइल चार्जर करते त्यामुळे झाड़ सुप्त अवस्तेत जात नाही‼पावुस आला की एकरी 2 लीटर सॉइल चार्जर ड्रेंचिंग करा, त्याचे कंटेंट वाचा सर्व मुलद्रव्ये आहेत!!
अमृत आहे ते झाडांसाठी‼
मित्रहो
अनेक मित्र दररोज तक्रार करतात सर पान गळ केली पण डालिम्ब् बागेत कळी येत नाही फ़क्त शूट येताहेत
मि विचार करतोय,...पावुस न झाल्यामुळे गेले 180 दिवस माझ्या घराच्या बागेला न पाण्याचा थेंब आहे न काही पोषण‼केवळ मागील 4 वर्षाच्या सॉइल् चार्जर टेक्नोलॉजी च्या पुण्याईवर अर्थात स्टोरेज वर बाग़ उभी आहे. बागेला काहिही करु शकलेलो नाही ... लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वता कोरडे पाषाण अशी माझी परिस्थिति आहे तरि 3 वेळ पावुस झाला तिन्ही वेळ मादी फूल निघाले ...जे फळे सेट झाली ती निरोगी आहेत... जोरदार स्ट्रोक असलेली मादी कळी निघाली आहे, माझ्या अंगठ्यापेक्षा जाड‼
विश्वास नाही बसणार तुमचा मला माहीत आहे लेख झाल्यावर फोटो टाकतो‼
असो
मि सॉइल चार्जर बद्दल सांगत होतो
त्यात ऑक्सिजन झाडाला मिळतो झाड़ एक्टिव राहते व त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत द्राक्षाच्या घड़ाचे व डालिम्बच्या फुलाचे अन्नं झाड़ थाम्बवत नाही‼ मित्रहो त्याचबरोबर सॉइल चार्जर मधील हाइड्रोजन मुळे फेरस चे अपटेक् वाढते. फेरससाठी हाइड्रोजन मोलिक्यूल ची गरज असते ... नैसर्गिक हाइड्रोजन चा स्रोत सॉइल चार्जर मधून मिळतो‼
जे प्रकाश संश्लेषण क्रियेतिल अत्यन्त महत्वाचे मुलद्रव्य आहे मैग्नीशियम त्याची उपलब्धता सॉइल् चार्जर ,फ्रूट चार्जर व फ्लावर चार्जर करून देते!!
तसेच आनीबानी च्या काळित झाडाला हवे असलेले घटक समप्रमाणात पुरवते‼
कार्बन हा सर्व मुलद्रव्यांचा कारभारी आहे , आवश्यक मात्रेमध्ये मुलद्रव्यांची उपलब्धता ,बफरिंग कैप्यासिटी अर्थात मुलद्रव्यां चा एकमेकांवर होणारा प्रभाव म्हणजेच त्यांच्यातले भांडण थांबवून ज्याची गरज आहे त्याला प्रवेश देते ‼
असे सर्व 38 कार्य करते सॉइल चार्जर असे शास्रज्ञांना संशोधनात आढळून आले आहे‼
मि पन अनुभवतोय‼
अजुन शिकतोय ,
चला तुम्ही पण या माझ्यासोबत‼
हे वाचून गप्प बसु नका प्रयोग करुण पहा‼
चर्चा करा मला तुमचे अनुभव सांगा प्रश्न विचारा ⁉
खर सांगू का मित्रांनो...
बागा नंतर कोमात जातात आधी मालकाचे विचार कोमात गेलेले असतात‼
"" चाललेय ते चालू दया ,कुणी कुणाशी नाय बोलायचे, हे असेच चालायचे "
ही विचारसरनि बदला‼
नवा विचार आहे आपल्या 40 वर्षाच्या धारणा तोड़नारा आहे,
आपल्या अहंकाराला धक्का देणारा आहे‼ कारन अनेक वर्ष आपण जी पद्धत वापरतो त्यातील दोष कोणी दुसर्याने दाखवले की स्वताची किंवा सांगणाऱ्या व्यक्तिचि चीड़ येते ‼
ही मानस शास्रीय घटना आहे , माझी चीड़ येवून सत्य थोडेच बदलनार आहे
मित्रहो आज थोड़या बागेवर प्रयोग करुण पहिला तर आपल्याला सत्य काय ते कळेलपुढच्या वर्षाची दिशा दिसेल
सर्वांना विनंति आहे किमान एका मित्राला हे ज्ञान दया जो अडचणीत आहे , परेशांन आहे!!तो मनापासून
धन्यवाद देईल‼
राम मुखेकर
सेंद्रिय कर्ब अभ्यासक व एकात्मिक शेती व्यवस्थापन मार्गदर्शक नाशिक